Maratha Reservation : … तर मी गोळ्या झेलायला तयार, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला काय इशारा?
कितीही गोळ्या घातल्या तरी घाबरणार नाही, मुंबईत येणारचं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. २६ जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केलीय. काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे..?
मुंबई, २५ जानेवारी २०२४ : मराठ्यांसह मनोज जरांगे पाटील पुण्यात धडकले आहेत. अवघ्या काही तासात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार आहे. तर सरकारने पूर्ण तयारी केली असून फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात कायदा करून आरक्षण देणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. रांजणगावावरून मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह पुण्याच्या खराडी गावात आलेत. हजारो मराठ्यांसह जरांगे मुंबईच्या दिशेने कूच करताय. कितीही गोळ्या घातल्या तरी घाबरणार नाही, मुंबईत येणारचं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. २६ जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केलीय. मागासवर्गीयांचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा करून आरक्षण देणार असा शब्द मराठा समाजाला पुन्हा दिलाय.