‘अजित पवार लवकर पहाटे काम करतात, मी उशीरापर्यंत’; शिंदे यांचा मिश्किल संवाद; तुफान फटकेबाजी

‘अजित पवार लवकर पहाटे काम करतात, मी उशीरापर्यंत’; शिंदे यांचा मिश्किल संवाद; तुफान फटकेबाजी

| Updated on: Jul 17, 2023 | 10:03 AM

त्याच्याआधी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून चहापाण्याचा कार्यक्रम बोलावण्यात आला होता. यासाठी विरोधकांना आमंत्रण देण्यात आलं होतं.

मुंबई, 17 जुलै 2023 | राज्याच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरूवात होत आहे. त्याच्याआधी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून चहापाण्याचा कार्यक्रम बोलावण्यात आला होता. यासाठी विरोधकांना आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तसेच टीका केली. यानंतर सरकारच्या वतीने आयोजीत पत्रकार परिषद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. तर शिंदे यांनी, अजित पवार लवकर पहाटे काम करतात, मी उशीरापर्यंत काम करतो तर फडणवीस हे तर ऑल राऊंडर आहेत. बॉलिंगपण करतात, विकेटपण घेतात आणि बॅटिंगपण करतात. चौकार, षटकार मारतात, फिल्डिंगपण चांगली करतात असं म्हणालेत. ज्यामुळे पत्रकारांमध्ये हशा पिकला होता.

Published on: Jul 17, 2023 10:03 AM