मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साईंच्या दरबारी, घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीश महाजन यांनीही साईबाबा समाधींचे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी आणि शिर्डी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव हे देखील उपस्थित होते. दरम्यान, आज एकनाथ शिंदे यांनी शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शासन काम करत आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाहीही दिली. ते शिर्डीच्या महापशुधन प्रदर्शन समारोप कार्यक्रमात बोलत होते. साईबाबांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीत थीम पार्क उभे करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नगरविकास विभागाच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले