'चित्रपटसृष्टीतील वात्सल्यमूर्ती हरपली', मुख्यमंत्र्यांनी घेतलं सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन

‘चित्रपटसृष्टीतील वात्सल्यमूर्ती हरपली’, मुख्यमंत्र्यांनी घेतलं सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन

| Updated on: Jun 05, 2023 | 12:59 PM

VIDEO | सुलोचना दीदींच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी (Sulochana Didi) अर्थात सुलोचना लाटकर यांचे काल निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपले अशी भावना समस्त चित्रपटसृष्टीकडून व्यक्त केली जात आहे. सुलोचना दीदींच्या निधनाची बातमी समोर येताच कलाकार मंडळींसह राजकीय नेत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली. अनेकांनी ट्वीट करत सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, सुप्रिया सुळे यांनीही श्रद्धांजली वाहली. तर आज दीदींच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांनीदेखील सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम देणाऱ्या चित्रपटसृष्टीतील वात्सल्यमूर्ती हरपल्या, असे म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. तर त्यांच्या जाण्याने प्रत्येकाला असं वाटतंय की, आपल्याच कुटुंबातील व्यक्ती गेलीये. असं प्रेम जिव्हाळा त्यांनी निर्माण केल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Published on: Jun 05, 2023 12:59 PM