मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा अयोध्येला जाणार; दिपक केसरकरांनी म्हणाले, राम आणि धनुष्यबाण…
VIDEO | उद्धव ठाकरे यांची जीभ घसरायला लागली आहे, पण... दिपक केसरकर यांनी काय दिला सल्ला, बघा व्हिडीओ
मुंबई : शिवसेना पक्ष आम्ही वाचवला, आज आमच्यासोबत धनुष्यबाण चिन्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जातील रामाचं धनुष्यबाण आज आमच्यासोबत आहे. राम आणि धनुष्यबाण जसं वेगळ करता येत नाही तसं हिंदुत्व आणि धनुष्यबाण वेगळं करता येत नाही. त्यामुळे धनुष्यबाण आज मिळालेली निशाणी नाही किंवा ती कोणत्याही धर्माशी संबंधित नसली तरी अत्यंत पवित्र अशी ती निशाणी असल्याचे शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटले आहे. पुढे ते असेही म्हणाले धनुष्य आणि बाण याचं आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे पावित्र्य आम्ही राखू असे दीपक केसरकर म्हणाले. तर यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले उद्धव ठाकरे यांची जीभ आता घसरायला लागली आहे. त्यांनी ते वेळीच थांबवावं. आम्ही त्यांचा आदर राखतो. त्या आदराला नेहमीच पात्र राहायला पाहिजे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघे वेगळी व्यक्तिमत्त्व आहे, त्यामुळे दोघांनी त्यांच्या त्यांच्यासारखे रहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.