महाराष्ट्रावर पुराचं संकट असताना मुख्यमंत्री दिल्लीत- संजय राऊत

महाराष्ट्रावर पुराचं संकट असताना मुख्यमंत्री दिल्लीत- संजय राऊत

| Updated on: Jul 19, 2022 | 3:00 PM

महाराष्ट्रावर पुराचं संकट असताना मुख्यमंत्री दिल्लीत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. रावसाहेब दानवे यांची जशी भाजपवर निष्ठा आहे तशीच माझीही शिवसेनेवर निष्ठा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.

महाराष्ट्रावर पुराचं संकट असताना मुख्यमंत्री दिल्लीत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. रावसाहेब दानवे यांची जशी भाजपवर निष्ठा आहे तशीच माझीही शिवसेनेवर निष्ठा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा दिला तरी खासदार शिवसेनेत थांबले का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यायला तयार आहे, शिवसेना पुन्हा एकदा ताकदीने उभी राहील, असं संजय राऊत म्हणाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यानंतरही पक्षाचे 12 खासदार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले.

Published on: Jul 19, 2022 03:00 PM