BJP : भाजपचं पारडं जडच… देवेंद्र फडणवीस होणार CM, मुख्यमंत्रिपदासह ‘ही’ मोठी खाती BJP कडे?
दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रिपदाची मागणी केली आहे. मात्र महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद देण्यास नकार देण्यात आला आहे.
दिल्लीत नुकतंच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महायुतीतील केंद्रीय नेतृत्व अमित शाह, जे.पी.नड्डा यांच्या महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थितीत होते. या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेबद्दल महत्त्वाचा निर्णय झाला असून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावार मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब कऱण्यात आला. या बैठकीत कोणाला कोणती मंत्रिपदं दिली जातील याचाचा निर्णय झाला असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रिपदाची मागणी केली आहे. मात्र महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद देण्यास नकार देण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीकडून मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप गृह खातं, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, गृह निर्माण, वन खातं, ओबीसी मंत्रालय, पर्यटन, सामान्य प्रशासन ही महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपचं पारडं जडच असणार असल्याचे दिसतंय.