Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट
महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना 12 नावांची यादी दिली होती. मात्र अनेक महिने उलटले तरी यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही.
मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना 12 नावांची यादी दिली होती. मात्र अनेक महिने उलटले तरी यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. यासह राज्यातील पाऊस आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीत कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबतची माहिती दिली.
Latest Videos