Subhash Desai | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषण पूर्ण करतात हीच त्यांची ओळख : सुभाष देसाई

Subhash Desai | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषण पूर्ण करतात हीच त्यांची ओळख : सुभाष देसाई

| Updated on: Sep 17, 2021 | 2:16 PM

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसमोर यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तुफान फटकेबाजी केली. 

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसमोर यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तुफान फटकेबाजी केली. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते.

मुख्यमंत्री महोदय आपण केलेल्या घोषणा पूर्ण करता ही आपली ओळख आहे, असे सुभाष देसाई म्हणाले. औरंगाबाद ते मगर रेल्वे मार्गाची आपण घोषणा केली त्याला रावसाहेब दानवे यांनी पाठिंबा दिला आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल पुढे पडले आहे. अनेक मुख्यमंत्री शुभारंभ करतात आणि उडघटनाला येतात, मात्र आपण 1680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची दोन वेळा पाहणी केलात. घनकचऱ्याचा डाग आपण पुसलात, इथले रस्ते आणि इतर सुविधांना आपण चालना दिली आहे. जिल्ह्याची जनता आपले ऋण व्यक्त करत आहेत. कोविड काळात आपण डगमगला नाहीत, जनतेनी सुद्धा पालन केलं त्यामुळे कोरोना संकट थोपवण्यात हा जिल्हा यशस्वी झाला, असे देखील सुभाष देसाई म्हणाले.