Devendra Fadnavis | मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचं उत्तर दिलं पाहिजे
या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दोन भाषणं केली. पहिलं भाषण शॉर्ट होतं. तर आजचं भाषण शिवाजी पार्कवरचं भाषण होतं, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली.
या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दोन भाषणं केली. पहिलं भाषण शॉर्ट होतं. तर आजचं भाषण शिवाजी पार्कवरचं भाषण होतं, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली. विधानसभा अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे नवाब मलिकांची (nawab malik) बाजू घेतात हे मोठं दुर्देव आहे. सत्तेसाठी आणि मतांसाठी शिवसेनेला काहीही करावं लागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. संपूर्ण अधिवेशनात कोणत्याही विषयाला हे सरकार उत्त देऊ शकलं नाही. पालिकेपासून विविध विभागातील भ्रष्टाचाराचं उत्तर या सरकारला देता आलं नाही. या अधिवेशनात कोणताही मोठा निर्णय घेण्यात आला नाही. जनतेला कोणताही दिलासा दिलेला नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
Published on: Mar 26, 2022 04:19 PM
Latest Videos