‘सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही’, CM Uddhav Thackeray यांचा विरोधकांना टोला
देशात जे गढूळ वातावरण बनत आहे. सूडाचं राजकारण वाढत आहे. ही आपल्या देशाची हिंदुत्वाची संस्कृती नाही. हे असंच सुरु राहिलं तर देशाला भविष्य काय? याचा विचार कुणीतरी करायला हवा होता. त्याची सुरुवात आज आम्ही केलीय. संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरली आहेत.
मुंबई : पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार अशा बातम्या येत होत्या. याची आपल्याला कल्पना आहे. त्याचा योग आज आला. कालच शिवरायांची जयंती होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमची भेट होते. आम्ही या भेटीतील काही लपवलं नाही. देशात जे गढूळ वातावरण बनत आहे. सूडाचं राजकारण वाढत आहे. ही आपल्या देशाची हिंदुत्वाची संस्कृती नाही. हे असंच सुरु राहिलं तर देशाला भविष्य काय? याचा विचार कुणीतरी करायला हवा होता. त्याची सुरुवात आज आम्ही केलीय. संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरली आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगना सख्खे शेजारी आहेत. राज्या राज्यात एक आपुलकीचं नातं राहिलं पाहिजे. नवी सुरुवात आज झालीय. त्याला आकार येण्यास वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत. देशातील मुलभूत प्रश्न सोडून इतर विषयांत हात घालण्यातच अनेकजण धन्यता मानत आहेत. पुढे जे काही ठरेल त्यावर वेळोवेळी माहिती दिली जाईल, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.