‘…म्हणून नाना पटोले हॅलिकॉप्टरने न जाता ट्रेनने गेले
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचं मोठेपण आज समोर आलं. नाना पटोलेंनी मुंबईला (Mumbai) ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या लहान मुलीसाठी स्वतःचे हेलिकॉप्टर दिले.
सोलापूर : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचं मोठेपण आज समोर आलं. नाना पटोलेंनी मुंबईला (Mumbai) ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या लहान मुलीसाठी स्वतःचे हेलिकॉप्टर दिले. सोलापुरातील (Solapur) उंजल तुकाराम दासी या 4 वर्षीय मुलीला हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईला जायचे होते. नाना पटोले हेलिकॉप्टरने सोलापूरला आले होते मात्र त्यांनी स्वतःचे हेलिकॉप्टर संबंधित मुलीच्या कुटुंबाला मुंबईला जाण्यासाठी दिले. नाना पटोले हेलिकॉप्टर ऐवजी रेल्वेने मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. उंजल तुकाराम दासी या लहान मुलीच्या हृदय विकाराच्या उपचाराकरीता मुंबई येथे जाण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांच्या विनंतीवरून नाना पटोले यांनी स्वत: चं हेलिकॉप्टर संबंधित मुलगी आणि तिच्या आई वडिलांना मुंबईला जाण्यासाठी दिलं.