चिंचवड पोटनिवडणुकीच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना अश्रू अनावर
VIDEO | श्रीरंग बारणे यांच्या भाषणादरम्यान दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या भावूक
पुणे : कसबा पेठ मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघात महाविकास आघाडीने तुल्यबळ उमेदवार उभा केल्याने पोटनिवडणुकीतील चुरस अधिकच वाढली आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवडमधील मतदान येत्या 26 फेब्रुवारी रोजी आहे. तर निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे या पोटनिवडणुकीच्या लढतीत सहभागी होऊन जोरदार प्रचार या नेत्याचा सुरू आहे. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे उभे आहेत. तर आज पुण्यातील सांगवी येथे झालेल्या प्रचार सभेत अश्विनी जगताप यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीरंग बारणे यांच्या भाषणादरम्यान दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.