विक्रोळीतील त्या अत्याचाराच्या घटनेवरून चित्रा वाघ आक्रमक; म्हणाल्या, ‘हरामखोरांना सोडलं जाणार नाही’
मुंबईतील विक्रोळी येथील एका मुंबई महापालिकेच्या शाळेत चार मुलींवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे सध्या शिक्षण विभागासह पालकांत संतापाची लाट उसळली आहे.
मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | मुंबईत अनेक घडना या घडत असतात. यात लैंगिक अत्याचाराच्याही असतात. पण यावेळी पुरती मुंबईही हादरली आहे. मुंबईतील विक्रोळी येथील एका मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळेत चार चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार शिक्षकानेच केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पीटी शिक्षक सौरव उचाटे या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याने चार विद्यार्थिनीचां लैंगिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यावरून भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ या आक्रमक झाल्या असून त्यांनी त्या शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिसांकडे अशी विकृतींना ठेचून काढा असे म्हणत या घटनेवर तिव्र संपात व्यक्त केला आहे. तर असल्या हरामखोरांना सोडलं जाणार नाही. तर ज्या शाळेने त्या नराधमाची नियुक्ती केली आहे. ती कोणत्या नियमांप्रमाणे केली आहे याची चौकशी व्हावी असेही त्यांनी म्हटलं आहे.