अल्पवयीन मुलीवर अत्याचार ही शरमेची बाब, कंट्रोल रुममध्ये काहीच न दिसणे हे कोडं, चित्रा वाघ यांचं टीकास्त्र
नागपूरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मागासवर्गीय मुलीवर झालेला गॅंगरेप हे महाराष्ट्रासाठी शरमेची बाब असून आरोपींनी एकाच ठिकाणी दोनदा पिडीत मुलीला आणून सोडले आणि हे प्रकरण पोलिसांना CCTV कंट्रोल रूम मध्ये न दिसणे हे एक कोडच असल्याचा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
नागपूरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मागासवर्गीय मुलीवर झालेला गॅंगरेप हे महाराष्ट्रासाठी शरमेची बाब असून आरोपींनी एकाच ठिकाणी दोनदा पिडीत मुलीला आणून सोडले आणि हे प्रकरण पोलिसांना CCTV कंट्रोल रूम मध्ये न दिसणे हे एक कोडच असल्याचा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला आहे. आज त्या नागपुरात आल्या असता पत्रकार परिषदेत बोलत होत्या . भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पीडित मुलीची बालसुधारगृहात भेट घेतली तसेच हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीसांच्या अपमानास्पद मारहानी नंतर 36 वर्षीय आत्महत्या करणाऱ्या महेश राऊत यांचा कुटुंबातील सदस्यांची घरी जाऊन भेट घेतली. गॅंगरेप प्रकरणात पोलीसांनी तात्काळ पीडितेची मेडिकल न केल्यामुळे आरोपीना फरार होण्यास मदत मिळाली असा आरोपही यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.राज्यात मुख्यमंत्री गृहमंत्रि यांचं कायदा सुव्यवस्थे संदर्भात माहिती आहे का असा सवाल करत महिला पोलीस कर्मचारी देखील सुरक्षित नसल्याच पत्रपरिषदेत वाघ यांनी स्पष्ट केलं..