नवाब मलिक यांनी बहुतेक राजीनामा दिला, सत्तेत असताना ट्विटद्वारे मागणी कशाला? चंद्रकांत पाटील यांची टीका

नवाब मलिक यांनी बहुतेक राजीनामा दिला, सत्तेत असताना ट्विटद्वारे मागणी कशाला? चंद्रकांत पाटील यांची टीका

| Updated on: Nov 06, 2021 | 11:48 AM

नवाब मलिकांनी या एजन्सीच्या कामकाजात पडू नये. वानखेडेंकडून तपास काढला का नाही यात त्यांनी का पडावं. एजन्सीचं काम एजन्सीला करु द्यावं, असा टोला चंद्रकांतदादांनी मलिकांना लगावला. आर्यन खान प्रकरणी बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले, “या सगळ्याची सुरुवात नवाब मलिकांनी केली. फार काळ आम्ही शांत बसलो तर आम्हालाही हे मान्य आहे असा त्याचा अर्थ निघतो, म्हणून आम्ही बोललो” नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असावा बहुतेक कारण सत्तेत अशताना ट्विटच्या माध्यमातून ते विविध प्रकारच्या मागण्या करु लागलेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई : नवाब मलिकांनी या एजन्सीच्या कामकाजात पडू नये. वानखेडेंकडून तपास काढला का नाही यात त्यांनी का पडावं. एजन्सीचं काम एजन्सीला करु द्यावं, असा टोला चंद्रकांतदादांनी मलिकांना लगावला. आर्यन खान प्रकरणी बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले, “या सगळ्याची सुरुवात नवाब मलिकांनी केली. फार काळ आम्ही शांत बसलो तर आम्हालाही हे मान्य आहे असा त्याचा अर्थ निघतो, म्हणून आम्ही बोललो” नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असावा बहुतेक कारण सत्तेत अशताना ट्विटच्या माध्यमातून ते विविध प्रकारच्या मागण्या करु लागलेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्य सरकारची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं
पेट्रोल डिझेल दर कपातीवर बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. नाचता येईना अंगण वाकडे, अशी राज्य सरकारची स्थिती आहे. १४ राज्यांनी दर कमी केलेत.आता तुम्हीही कमी करा. प्रत्येक वेळी केंद्रावर का ढकलता?, असा सवाल चंद्रकांतदादांनी केला.

Published on: Nov 06, 2021 11:47 AM