गंडा घालणाऱ्या ‘त्या’ तोतयाचं आणि भाजप आमदारांचं फोनवरील बोलणं ‘tv9 मराठी’कडे, बघा काय म्हणाला…
VIDEO | भाजप आमदारांकडे मंत्रिपदासाठी केली पैशांची मागणी, अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, काय म्हणाला होता फोनवर बघा...
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत एका तोतयाने भाजप आमदारांना चांगलाच गंडा घातल्याचे समोर आले आहे. या भामट्याने सहाय्यकाच्या नावाने आमदारांकडे पैशांची मागणी केली इतकच नाही तर त्याने मंत्रिपदाची स्वप्न दाखवून या आमदारांची फसवणूक केली. आपल्याला मंत्रिपद द्यायचे असून पक्ष निधीसाठी जवळपास पावणे दोन कोटी रुपये जमा करावे लागतील, रक्कम दिल्यानंतर मंत्रीपद निश्चित केले जाईल, अशी हमी त्याने दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूरातील भाजपचे ज्येष्ठ आमदार विकास कुंभारे यांना एक फोन आला. या फोनवर त्या भामट्याने स्वतःचे नाव नीरज सिंह राठोड असल्याचे सांगून स्वतःची ओळख जेपी नड्डा यांचे स्वीय सहाय्यक असल्याची करून दिली. आमदार विकास कुंभारे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या भामट्याला अटक केली आहे. राज्यातील चार आमदारांकडे त्यांनी पैशांची मागणी केली होती. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ आमदार विकास कुंभारे आणि आरोपी यांचं पैशांची मागणी करणारं एक कथित संभाषण ‘tv9 मराठी’च्या हाती लागलेलं आहे. बघा या तोतयानं कशी पैशांची मागणी केली. मात्र tv9 मराठी या ऑडिओ क्लिपची कोणतीही पुष्टी करत नाही…