भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा सहाय्यक असल्याचा बनाव अन् मंत्रिपदाचं आमिष दाखवत भाजप आमदारांनाच घातला गंडा
VIDEO | भामट्यानं केला बनाव अन् भाजप आमदारांकडे केली मोठी मागणी, तक्रारीनंतर प्रकार आला उघडकीस
नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्यापूर्वीच मोठी घटना समोर आली आहे. जेपी नड्डा यांचा सहाय्यक असल्याचा बनाव करून एका भामट्याने थेट भाजपच्या चार आमदारांना गंडा घातला आहे. या भामट्याने सहाय्यकाच्या नावाने आमदारांकडे पैशांची मागणी केली इतकच नाही तर त्याने मंत्रिपदाची स्वप्न दाखवून या आमदारांची फसवणूक केली. नागपूर पोलिसांनी या आरोपीला आमदाबाद मधून अटक केली आहे. आमदार विकास कुंभारे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या भामट्याला अटक केली आहे. या तोतयाचे नाव नीरज सिंह राठोड असे असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूरातील भाजपचे ज्येष्ठ आमदार विकास कुंभारे यांना एक फोन आला. या फोनवर त्या भामट्याने स्वतःचे नाव नीरज सिंह राठोड असल्याचे सांगून स्वतःची ओळख जेपी नड्डा यांचे स्वीय सहाय्यक असल्याची करून दिली. आपल्याला मंत्रिपद द्यायचे असून पक्ष निधीसाठी जवळपास पावणे दोन कोटी रुपये जमा करावे लागतील, रक्कम दिल्यानंतर मंत्रीपद निश्चित केले जाईल, अशी हमी त्याने दिली. यासर्व घडलेल्या प्रकाराची माहिती कुंभारे यांनी पोलिसांना दिली, त्यानंतर पोलिसांनी नीरज राठोड याला मोरबी अहमदाबाद येथून अटक केली. टेकचंद सावरकर तानाजी मुरकुटे आणि नारायण कुचे या राज्यातील आणखी तीन आमदारांकडे त्याने कोट्यावधीची मागणी केल्याचे समोर आले आहे.