टार्गेट सरकार की समाज? छगन भुजबळांच्या ‘त्या’ विधानावर तिन्ही पक्षांची भूमिका काय?
छगन भुजबळ आणि त्यांच्यासोबतच्या ओबीसी नेत्याचं भांडण मनोज जरांगेंच्या मागण्या आणि सरकारसोबत आहे. कारण त्यांच्याच दाव्यानुसार सरकार जरांगे पाटील यांच्या मागण्यांना झुकतं माप देतंय. मात्र यामध्ये एका घटनेवरून सत्तेत असलेल्या भुजबळांनी दोन समाजाचा उल्लेख केला.
मुंबई, ६ फेब्रुवारी, २०२४ : मराठा आणि नाभिक समाजाबद्दल जे विधान केलं होतं. ते फक्त एका गावाबद्दल होतं तर संपूर्ण समाजाबद्दल नाही, असं स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं. मात्र यापूर्वी छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांची विधानं वादाचा विषय ठरली होती. छगन भुजबळ आणि त्यांच्यासोबतच्या ओबीसी नेत्याचं भांडण मनोज जरांगेंच्या मागण्या आणि सरकारसोबत आहे. कारण त्यांच्याच दाव्यानुसार सरकार जरांगे पाटील यांच्या मागण्यांना झुकतं माप देतंय. मात्र यामध्ये एका घटनेवरून सत्तेत असलेल्या भुजबळांनी दोन समाजाचा उल्लेख केला. यावर प्रकाश शेंडगे म्हणताय, एका तरूणाने आवाहन केलं होतं त्याचा उद्वेग म्हणून छगन भुजबळ तसं म्हणाले. त्या भावना समजून घ्यायला हव्यात, असेही त्यांनी म्हटले. मात्र नुसते छगन भुजबळच नाही तर ओबीसी नेत्यांनी केलेले विधानंची चांगलीच चर्चेत होती…बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट