Virar Crime | पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्याच्या रांगेवरून वाद, कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण

Virar Crime | पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्याच्या रांगेवरून वाद, कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण

| Updated on: Sep 22, 2021 | 12:10 AM

वसई विरार नालासोपारा शहरात सीएनजी असणारा एकमेव पेट्रोल पंप विरारमध्ये आहे. त्यामुळे पहाटे 4 पासूनच याठिकाणी वाहनधारकांच्या सीएनजी साठी रांगा लागतात. आजही त्याचप्रमाणे रांगा लागल्या होत्या. यावेळी एक अनोळखी रिक्षाचालक सकाळी 7 च्या सुमारास सीएनजी भरण्यासाठी आला होता.

पालघर : वसई विरार नालासोपारा शहरात सीएनजी असणारा एकमेव पेट्रोल पंप विरारमध्ये आहे. त्यामुळे पहाटे 4 पासूनच याठिकाणी वाहनधारकांच्या सीएनजी साठी रांगा लागतात. आजही त्याचप्रमाणे रांगा लागल्या होत्या. यावेळी एक अनोळखी रिक्षाचालक सकाळी 7 च्या सुमारास सीएनजी भरण्यासाठी आला होता. त्याने सीएनजीच्या भरण्यावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा माणूस 3 तासानंतर त्याच्या पत्नीला घेऊन आला. तसेच पुन्हा दादागिरी करत पेट्रोल पंपावरील चालकास मारहाण केली.