AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा

| Updated on: Apr 16, 2025 | 4:23 PM

संभाजीनगरमध्ये काल मध्यरात्री 2 गटात तूफान राडा झालेला बघायला मिळाला आहे. या प्रकरणी 30 जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

संभाजीनगरच्या तीसगावमध्ये काल रात्री मध्यरात्री 2 गटात वाद झाला आहे. जुन्या वादातून हा राडा झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या राड्यानंतर 25 ते 30 लोकांवर मारहाणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी 5 जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे.

जुन्या भांडणातून छत्रपती संभाजीनगरमधल्या तिसगावात काल मध्यरात्रीच्या सुमारास 2 गटात तूफान राडा झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवलं. या प्रकरणी 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे.

Published on: Apr 16, 2025 04:23 PM