मराठा समाजाच्या लोकसभा उमेदवार ठरवण्याच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा समाजाची मराठा मंदिरात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक सुरू होती. याबैठकीदरम्यान झाला तुफान राडा, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर येथे आज आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा समाजाची मराठा मंदिरात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक सुरू होती. याबैठकीदरम्यान मराठा समाजातील बांधवांमध्येच हाणामारी झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. 60 ते 70 समाज बांधव बैठकीला उपस्थित होते. सुरुवातीला बैठक शांततेच्या मार्गाने सुरू होती, मात्र अचानक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही कार्यकर्त्यांनी विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन बैठक आयोजित केल्याचा आरोप केल्याची माहिती मिळतेय. आरोपानंतर विकी पाटील या तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात झाली. बाळू औताडे या तरुणाकडून सुरुवातीला मारहाण झाली. त्यानंतर इतरही तरुणांनी मारहाण केली. मारहणीनंतर बैठक उधळली गेली आणि पुढे बराच वेळ राडा सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.