छगन भुजबळ यांच्या अंगात मस्ती, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा डिवचलं
भुजबळ माफी मागत नाही म्हणजे ते मग्रूर त्यांच्या अंगात मस्ती आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी करत त्यांनी भुजबळ यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेवर पलटवार करताना छगन भुजबळ यांनी जरांगेंना चांगलंच फटकारलं
मुंबई, ८ फेब्रुवारी, २०२४ : मंत्री छगन भुजबळ हे राजीनामा देणाऱ्यातले नाहीत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांना डिवचल्याचे पाहायला मिळाले. तर छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाचा अपमान केला आहे, त्यामुळे भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. इतकंच नाहीतर छगन भुजबळ माफी मागत नाही म्हणजे ते मग्रूर त्यांच्या अंगात मस्ती आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी करत त्यांनी भुजबळ यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेवर पलटवार करताना छगन भुजबळ यांनी जरांगेंना चांगलंच फटकारलं. भुजबळ म्हणाले, ‘काही खोडसाळ लोकांनी ध चा मा केला. मराठ्यांची हजामत करू नका हे फक्त मी एका गावापुरतं सांगितलं होतं’. बघा नेमकं कशावरून दोघांमध्ये पुन्हा जुंपली….
Published on: Feb 08, 2024 06:23 PM
Latest Videos