भैरवगडाची ४५० फुटी समोरील कातळ भिंत गिर्यारोहकाकडून सर, बघा धडकी भरवणारा व्हिडीओ
VIDEO | छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सह्याद्री खोऱ्यातील भैरवगडाची ४५० फुटी समोरील कातळ भिंत गिर्यारोहकांकडून सर
पुणे : आज १४ मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी केली जात आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधत काही गिर्यारोहकांनी उत्तुंग अशी कामगिरी केली आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात रोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा मोरोशीच्या भैरवगड. या भैरवगडाच्या ४५० फुटी समोरील कातळ भिंत खेड तालुक्यातील काही गिर्यारोहकांनी सर केल्याचा पराक्रम गाजवला आहे. टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी भैरवगडाच्या ४५० फुटी समोरील कातळ भिंत सर करीत भगवा स्वराज्य ध्वज हाती घेत छत्रपती संभाजी राजेंचा जयजयकार केला आणि गडाच्या टोकावर जात त्यांना मानाचा मुजरा केला. बघा धडकी भरवणारा गिर्यारोहकांनी सर केलेल्या भैरवगडाच्या ४५० फुटी समोरील कातळ भिंत…
Published on: May 14, 2023 02:06 PM
Latest Videos