पक्ष वेगळे, सगेसोयरे सगळे...नगरच्या सर्वपक्षीय गणगोताची होतेय चर्चा

पक्ष वेगळे, सगेसोयरे सगळे…नगरच्या सर्वपक्षीय गणगोताची होतेय चर्चा

| Updated on: Apr 07, 2024 | 10:52 AM

कोणताही काना-मात्रा नसलेला जिल्हा राजकीय गणगोतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सहकाराची पंढरी आणि सगेसोयऱ्यांमुळे पक्षीय भूमिकेंऐवजी आपापसातील सहकार म्हणून नगरच राजकारण चांगलंच चर्चेंत राहतं. मात्र यंदाही नगरमध्ये सोऱ्यांच्या राजकारणाची चर्चा

नगरचे राजकारण हे सगेसोयऱ्यांचं राजकारण म्हणून ओळखलं जातं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय गणगोताची चांगलीच चर्चा होतेय. राज्यातील समीकरणं बदलली त्याचप्रमाणे सगेसोयऱ्यांची गणितं बदलणार का? अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. कोणताही काना-मात्रा नसलेला जिल्हा राजकीय गणगोतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सहकाराची पंढरी आणि सगेसोयऱ्यांमुळे पक्षीय भूमिकेंऐवजी आपापसातील सहकार म्हणून नगरच राजकारण चांगलंच चर्चेंत राहतं. मात्र यंदाही नगरमध्ये सोऱ्यांच्या राजकारणाची चर्चा आहे. राजकारणात सगसोयऱ्यांच्या नात्याचं जाळ हे नगर, पाथर्डी, राहुरी, नेवासा, संगमनेर, शेवगाव आणि कोपरगावात विस्तारलंय. नगरच्या सर्वपक्षीय गणगोताची चर्चा कायम असल्याने नगरच्या राजकारणात यंदा काय होणार यांची चर्चा सध्या रंगताना दिसते., कसं आहे हे विस्तारलेलं गणगोत बघा स्पेशल रिपोर्ट….

Published on: Apr 07, 2024 10:52 AM