रशियन विमान उड्डाणासाठी अमेरिकन हवाई क्षेत्र बंद - बायडन

रशियन विमान उड्डाणासाठी अमेरिकन हवाई क्षेत्र बंद – बायडन

| Updated on: Mar 02, 2022 | 9:58 AM

अमेरिकेने यापूर्वीच रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. आता रशियन विमान उड्डाणासाठी अमेरिकन हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आज केली. नाटो देशांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रशियाने युक्रेनवर युद्ध लादले आहे. रशियाच्या हल्ल्यामध्ये आतापपर्यंत युक्रेनची प्रचंड प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी झाली आहे. रशियाने युद्ध मागे घ्यावे यासाठी अनेक देशांकडून दबाव वाढत आहे. मात्र तरी देखील रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरूच ठेवल्याने अमेरिका अधिक आक्रमक झाली आहे. अमेरिकेने यापूर्वीच रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. आता रशियन विमान उड्डाणासाठी अमेरिकन हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आज केली. नाटो देशांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.