Mumbai | मरीन ड्राईव्हवर ढगाळ वातावरण, वाऱ्याचा वेग वाढला
थंडीसाठी हक्काच्या समजल्या जाणाऱ्या डिसेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. मरीन ड्राईव्ह परिसरात वाऱ्याचा वेग वाढला.. काळे ढग दाटून आले… आजही पावसाचा इशारा…मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, आदी जिल्ह्यांत पाऊस झाला.
थंडीसाठी हक्काच्या समजल्या जाणाऱ्या डिसेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. मरीन ड्राईव्ह परिसरात वाऱ्याचा वेग वाढला.. काळे ढग दाटून आले… आजही पावसाचा इशारा…मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. बुधवारी सांताक्रूझ येथे 28.6 मिमी, कुलाबा येथे 27.6 मिमी, पाऊस पडला. अरबी समुद्रामध्ये 30 नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. 1 डिसेंबरला त्याची तीव्रता वाढल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर कमी होणार असला, तरी आणखी दोन दिवस मुंबई ठाण्यात पाऊस पडणार आहे.
Latest Videos