CM Annapurna Yojana : महिलांनो…. तरच तुम्हाला वर्षाला मिळणार 3 FREE गॅस सिलिंडर, काय आहे नवी योजना?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांसाठी मोठ्या योजनांची घोषणा करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर करण्यात आली. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असताना आता राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील लागू होणार..
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांसाठी मोठ्या योजनांची घोषणा करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर करण्यात आली. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असताना आता राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील लागू करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे. यासंदर्भातील जीआर राज्य शासनाकडून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान, उज्वला योजनेतील ५२.१६ लाख लाभार्थ्यांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे. राज्यभरात लागू होणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची पात्रता काय आणि या योजनेच्या लाभासाठी निकष काय?