Special Report | महाराष्ट्रात गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदीचे संकेत?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी जमवणारे राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम टाळ, असं आवाहन सर्वपक्षीयांना केलं. पण अनेकांच्या मते जर कोरोना वाढला महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागू शकतात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी जमवणारे राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम टाळ, असं आवाहन सर्वपक्षीयांना केलं. पण अनेकांच्या मते जर कोरोना वाढला महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागू शकतात. कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही. जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आज पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वच राजकीय पक्ष आणि नागरिकांना आवाहन केलं. पण त्यांच्या अवाहनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.