‘मैं अकेला चला था, लोग साथ आते गए और…’, साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक VIDEO : शेरो शायरी करत भुजबळांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, बघा काय म्हणाले?
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने सातारा नायगाव येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. एकाच वाहनातून या दोन बड्या नेत्यांनी प्रवास केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आल्याचेही पाहायला मिळाले. तर दुसरीकडे याच साताऱ्यातील […]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने सातारा नायगाव येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. एकाच वाहनातून या दोन बड्या नेत्यांनी प्रवास केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आल्याचेही पाहायला मिळाले. तर दुसरीकडे याच साताऱ्यातील कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकमेकांचे कौतुक केले. वाक़िफ़ काहा जमाना हमारे उड़ान से वो और थे जो हार गए आसमान से… असं छगन भुजबळ म्हणाले तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी शायरी करत असे म्हटले की, मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया.. असं उत्तर भुजबळांच्या शायरीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आले आहे. बघा काय म्हणाले भुजबळ आणि फडणवीस?