मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला, थेट पोहोचले ‘शिवतीर्था’वर… कारण नेमकं काय?
राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी महापालिका निवडणुकांची तयारी सुरु असताना राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. सकाळीच राज ठाकरे यांचं शिवतीर्थ निवासस्थान असलेल्या बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या अर्धातासांपासून चर्चा सुरु असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या कारणासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली? या भेटीमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. देवेंद्र फडणवीस हे आज होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मात्र त्या कार्यक्रमापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागचे नेमकं कारण काय? त्यांच्या भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं

कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप

Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?

प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
