MPSC Exams : भविष्यात MPSC ची मोठी भरती; मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा
CM Devendra Fadnavis Big Announcement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत बोलताना MPSC ची मोठी भरती होणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे.
भविष्यात मोठी MPSC ची भरती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत बोलताना दिली आहे. याबद्दलची घोषणा करताना त्यांनी कुठलाही विरोध ग्राह्य धरला जाणार नाही, असं म्हंटलं आहे. UPSC प्रमाणे MPSC मध्ये देखील कॅलेंडर असावे असा प्रयत्न आमचा असणार आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत. तसंच यावर्षीपासून MPSC ची परीक्षा ही डिस्क्रीप्टीव्ह स्वरूपात घेण्यात येणार आहे. यापूर्वी ऑप्शनल प्रश्नांची ही परीक्षा असायची. यावर्षीपासून मात्र MPSC च्या परीक्षेचं स्वरूप बदलण्यात येणार आहे. याबद्दल आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
Published on: Mar 19, 2025 04:16 PM
Latest Videos

चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले

अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार

हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई

एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
