फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचे संकेत, शिंदेच्या सेनेची संमती की विरोध?

फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचे संकेत, शिंदेच्या सेनेची संमती की विरोध?

| Updated on: Dec 08, 2024 | 10:15 AM

विधानसभा निवडणुकीत महायुतीने मनसेला सोबत घेतलं नाही. मनसेने १२५ जागा लढल्या मात्र काही ठिकाणी मनसेला पाठिंबा देण्याचा निर्णय भाजप होता. शिवडीत बाळा नांदगावकर यांच्याविरोधात महायुतीने उमेदवार दिला नाही. पण माहिमवरून शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेत बिघडलं

मुंबई महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सोबत घेण्याचे संकेत दिलेत खरे पण शिंदेंच्या शिवसेनेने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करावी लागेल असे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आणि उदय सामंत म्हणताय. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मनसेला सोबत घेतलं नाही. मनसेने १२५ जागा लढल्या मात्र काही ठिकाणी मनसेला पाठिंबा देण्याचा निर्णय भाजप होता. शिवडीत बाळा नांदगावकर यांच्याविरोधात महायुतीने उमेदवार दिला नाही. पण माहिमवरून शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेत बिघडलं. शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकरांनी माघार घेतली नाही तिथेच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सदा सरवणकरांचा पराभव झाला आणि ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत विजयी झालेत. त्याचाच परिणाम म्हणून मनसेला सोबत घेण्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. तरी शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे निर्णय घेतील असे सांगितले जात आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 08, 2024 10:15 AM