देवेंद्र फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? 14 तारखेला विस्तार, नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?

देवेंद्र फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? 14 तारखेला विस्तार, नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?

| Updated on: Dec 13, 2024 | 11:58 AM

भाजपला २०, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना १३ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे स्वतः गृहखात्यासाठी आग्रही आहेत. परंतू भाजप गृहखातं सोडण्यास तयार नाही. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गृह आणि अर्थ खातं भाजप स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता आहे.

दोन दिवस दिल्लीचा दौरा अटोपून देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल झालेत. नेमके कोण मंत्री होणार यावरून चर्चा झाली असून फॉर्म्युला ठरला असल्याचे माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर भाजपच्या यादीवर अंतिम निर्णय हायकमांड घेईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. याभेटीदरम्यान, भाजपात कोण-कोण मंत्री असतील यावर चर्चा झाली. तर महायुतीच्या खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपला २०, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना १३ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे स्वतः गृहखात्यासाठी आग्रही आहेत. परंतू भाजप गृहखातं सोडण्यास तयार नाही. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गृह आणि अर्थ खातं भाजप स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता आहे. गृहखातं जर शिवसेनेला मिळणार नसेल तर अर्थ खातं भाजपने स्वतःकडेच ठेवावं अशी शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे अजित पवारांच्या पदरात महसूल आणि शिवसेनेकडे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं मिळू शकतं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 13, 2024 11:58 AM