छगन भुजबळ अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण, राजकारणात मोठ्या घडामोडी
पुण्याजवळील चाकण येथे आज महात्मा जोतिराव फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत महात्मा जोतिराव फुले आणि आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे अनावरण होत आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील जन्म गाव नायगाव या ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात नायगावच्या वेशीवर देवेंद्र फडणवीसांचे स्वागत केले. यावेळी देवेंद्र फडणवीसांसोबत छगन भुजबळ, पंकजा मुंडे, मकरंद पाटील हे नेते उपस्थित होते. दरम्यान, पुण्याजवळील चाकण येथे आज महात्मा जोतिराव फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत महात्मा जोतिराव फुले आणि आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे अनावरण होत आहे. या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच मंचावर दिसणार होते. मात्र त्यापूर्वी छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र एकाच गाडीतून प्रवास केल्याचे दिसले. मंत्रीमंडळ विस्तारामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यात देवेंद्र फडणवीस हे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते. तर त्यांच्या मागच्या सीटवर हे छगन भुजबळ हे बसले होते. हे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले आणि चर्चांना उधाण आले आहे.