मुख्यमंत्री अन् राज ठाकरेंच्या भेटीमागचा नेमका अर्थ काय? ‘शिवतीर्थ’वर तासभर खलबतं, काय झाली चर्चा?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. एक तास ही भेट झाली आणि त्यानंतर सदिच्छा भेट असल्याचं स्वतः मुख्यमंत्री म्हणाले. मात्र भाजपनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी साधारण तासभर खलबतं झाली. विधानसभेच्या निकालानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी आले. मात्र राजकीय भेट नाही म्हणत नाश्ता केला, गप्पा मारल्या असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय. पण इनसाइड स्टोरी अशी आहे की, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेऊ शकते. अमित ठाकरेंना भाजप आपल्या कोट्यामधून राज्यपाल नियुक्त आमदार करू शकते. राजकीय भेट नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं असलं आणि मनसेच्या संदीप देशपांडे यांनी देखील ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं असलं तरी राजकीय वर्तुळात राजकीय ॲंगलन चर्चा होणार. कारण लवकरच महाराष्ट्रात महापालिकांच्या निवडणुका आहेत. विशेषतः मुंबईकडे भाजपाचा खास फोकस आहे. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी मोजक्या प्रतिक्रिया दिल्या पण प्रकाश महाजन यांनी मात्र रोखठोक भूमिका घेतली आहे. भाजपनं उघडपणे समोर यावं. छुप्या पद्धतीने मनसेचं नुकसान होईल असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागचा नेमका अर्थ काय? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
