Devendra Fadnavis : ‘अमरावतीचं माझ्यावर कर्ज, मी कायम…’, मुख्यमंत्री फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
'आम्ही तिघेही महाराष्ट्राचा विकास करत आहोत. महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करायचं आहे. आज या एअरपोर्टचं काम आपण पूर्ण केलं. २०१९ला काम सुरू केलं होतं. मोदींच्या सरकारमध्ये प्रयत्न करून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने काम हाती घेतलं. धावपट्टीचं विस्तारीकरण केलं. राज्य सरकारशी संबंधित काम संथगतीने होतं. शिंदे आल्यानंतर वेगाने काम सुरू केलं'
आज अमरावतीमध्ये विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीचं माझ्यावर कर्ज असल्याचे म्हटलं. ‘अमरावतीचं माझ्यावर कर्ज आहे. माझी आई अमरावतीची आहे. त्यामुळे अमरावतीशी माझं वेगळं नातं आहे. अमरावतीत काही चांगलं झालं तर सर्वाधिक आनंद माझ्या आईला होतो. त्यामुळे आईला आनंद देणं माझ्या आनंदाचं एक कारण असतं.’, असं ते म्हणाले. ‘रुक्मिनीचं हरण करताना अमरावतीत श्रीकृष्णाने अमरावतीत वायुवेगाने हरण केलं होतं. तो वायुवेग तर आपल्याला पाहता आला नाही. पण अमरावतीत वायू वेगाने येता येईल आणि वायू वेगाने जाता येईल. ही व्यवस्था मोदींच्या सरकारने केली आहे. डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं. केवळ डबल इंजिनचं सरकार नाही. डबल बुस्टर की सरकार आहे. म्हणून आमचं सरकार वेगाने चालतंय’, असं म्हणत देवेंद्र फडणवीसयांनी सरकारचे कौतुक केलं.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार

शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...

युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..

'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
