CM Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात? मुख्यमंत्र्यांनी केले गंभीर आरोप
Cm Devendra Fadnavis On Jaykumar gore Case : मंत्री जयकुमार गोरे प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची आता शक्यता आहे. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
तुषार खरात आणि इतरांनी मंत्री जयकुमार गोरे प्रकरणा विरोधात व्हिडिओ तयार केल्यानंतर, ते व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले आहेत. जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात बोलताना केला आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आता या प्रकरणाची चौकशी होईल. मात्र, त्यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. आपण राजकीय शत्रू नाही तर राजकीय विरोधक आहोत. मात्र, अशा प्रकारे कोणाला जीवनातून उठवून टाकायचे, अशा प्रकारचे राजकारण होत असेल तर हे चुकीचं आहे. या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी तुषार खरात याच्या संपर्कात होते. गोरे यांच्या विरोधात जे व्हिडिओ तयार केले गेले, ते आधी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र

'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
