Nitesh Rane Video : देवेंद्र फडणवीस यांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, ‘त्या’ विधानावरून फटकारलं
नागपूरमध्ये काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काळजी घेतल्याचं स्पष्ट चित्र पाहायला मिळतंय. वादग्रस्त वक्तव्य टाळा अशी मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्री नितेश राणेंना तंबी देण्यात आलेली आहे.
वाद्ग्रस्त वक्तव्य करण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंना तंबी दिली आहे. वादग्रस्त वक्तव्य टाळा, अशी तंबी नितेश राणे यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्याच कळतंय. नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. या मंत्र्याची हकालपट्टी करा, अशी मागणी करण्यात आलेली होती. सध्या मुंबईत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात औरंगजेबाचा मुद्दा चांगलांच तापल्याचा पाहायला मिळतोय. विरोधक सत्ताधारी दोघेही आक्रमक होतायत पण हा विषय सरकारच्या अंगाशी येऊ नये म्हणून आता मुख्यमंत्र्यांनीच खबरदारी घेतली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये असून त्यांनी सर्व आमदारांना त्यांनी तंबी दिलेली आहे. वादग्रस्त वक्तव्यापासून सावध रहा अन्यथा पक्षांतर्गत कारवाईला देखील सामोरे जाऊ लागू शकते. अशा शब्दात स्पष्ट इशाराच या सर्व मंत्र्यांसह आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे आता नेमकं पुढे या वक्तव्याबरोबर काय भूमिका घेतली जाईल ते सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी ज्या पद्धतीचं विधान केलं होतं यानंतर इतर जे आमदार विधान करत होते किंवा जी भूमिका मांडत होते याला कुठेतरी चाप बसवा यासाठी मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये आल्याचं बोललं जातंय.

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण

फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल

कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
