विधानसभेतही मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
विधानसभेतही मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर भाषण केलं. आम्ही मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आज वचनाची पूर्तता केली असे म्हणत शिंदे म्हणाले...
मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणाच्या मसुद्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिल्यानंतर विधानसभेतही मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर भाषण केलं. आम्ही मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आज वचनाची पूर्तता केली असे म्हणत शिंदे म्हणाले, मराठा आरक्षण टिकेल की नाही याबाबत अनेकांना शंका आहे. पण तुम्ही चिंता करू नका. मराठा आरक्षण टिकेल, असा विश्वास व्यक्त केला. तर मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता असल्याने दिलेला शब्द पाळतो म्हणून लोकं माझ्यावर विश्वास ठेवतात. मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा आणि लढ्याचा हा विजय आहे. लाखो करोडो मराठा बांधवांनी आपल्या हक्कांसाठी लढा देताना संयम ठेवला आणि शिस्त मोडली नाही. याबद्दल शिंदेंनी सर्व मराठा समाजाचे आभार व्यक्त केले.