Special Report | मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा निशाणा अन् एकनाथ शिंदे यांचा भडका, काय आहे प्रकरण?
VIDEO | पाचोऱ्यातील सभेत उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उतरले मैदानात, काय आहे नेमकं प्रकरण बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : जळगावातील पाचोऱ्याच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेत. ठाकरे यांची तोफ नरेंद्र मोदी यांच्याकडे वळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले. त्यामुळे मोदींविरोधात शिंदे विरूद्ध ठाकरे असा सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला पण टीका करताना उद्धव ठाकरे यांच्या भाषेच्या लहेजा जो होता त्यावर सवाल उपस्थित केले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने ते द्वेषाने बोलत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान मोदी नेहमीच आपल्या भाषणातून आपण फकीर असल्याचा उल्लेख करतात. मात्र त्याच वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार पाचोऱ्यात टीका केली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलंय बघा त्यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Apr 25, 2023 08:40 AM
Latest Videos