Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet meeting decision: रोजगारासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणता झाला मोठा निर्णय?

Cabinet meeting decision: रोजगारासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणता झाला मोठा निर्णय?

| Updated on: Feb 05, 2024 | 5:28 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मुंबईकरांना यंदाही दिलासा देण्यात आला असून मुंबईकरांच्या मालमत्ता करात कोणता बदल करण्यात आला? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून...

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मुंबईकरांना यंदाही दिलासा देण्यात आला असून मुंबईकरांच्या मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे. तर राज्यात दोन लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करणार आहे. शिर्डी विमानतळाचा आणखी विस्तार करण्यासह नवीन इमारत उभारणार आहे, असे अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहे. तर धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागण्याबाबत बैठकीत निर्णय झाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमण्यात येणार आहे. यासह कोणते मोठे निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून…

Published on: Feb 05, 2024 05:28 PM