सरकारचं अपयश, मुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट मागणी

सरकारचं अपयश, मुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट मागणी

| Updated on: Oct 30, 2023 | 6:34 PM

VIDEO | 'सध्या राज्यात कायदा आणि सुवस्थेची परिस्थिती बिघडली आहे, त्याला गृहमंत्री जबाबदार आहे. सरकारने थोडं जबाबदारीने वागायला हवं. वेगवेगळे मंत्री वेगवेगळ्या कारणांनी घरी बसताय. हे चांगलं नाही', आक्रमक होत राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट मागणी केली आहे.

नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर २०२३ | छत्तीसगडमधील प्रचार महत्त्वाचा आहे की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था? असा सवाल करत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलंय. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. आव्हाड म्हणाले, ‘सरकारने थोडं जबाबदारीने वागायला हवं. वेगवेगळे मंत्री वेगवेगळ्या कारणांनी घरी बसताय. हे चांगलं नाही. त्यामुळे त्या-त्या मंत्र्यांनी आपली जबाबदारी ओळखून प्रचार आणि दौरे करायला हवेत.’ तर सध्या राज्यात कायदा आणि सुवस्थेची परिस्थिती बिघडली आहे, त्याला गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. ती अत्यंत योग्य आहे. असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले,

Published on: Oct 30, 2023 06:34 PM