मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पोहरादेवी दौऱ्यावर, वाशिममध्ये दौऱ्याची कशी आहे तयारी? बघा व्हिडीओ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १५ मंत्री आज पोहरादेवीच्या दौऱ्यावर
वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १५ मंत्री आज पोहरादेवीच्या दौऱ्यावर आहेत. वाशिममध्ये ५९३ कोटी रूपयांच्या विकासकामांची पायभरणी होणार असून तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सेवालाल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे बांधव-भगिनी पोहरादेवीमध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी महंतासाठी आणि नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. बंजारासमाजाच्या महिला बंजारा वेशभुषेत दाखल झालेल्या आहेत. बंजारा समाजाचे गाणं म्हणच बंजारा नृत्यावर बंजारा महिलांनी ठेका धरल्याचेही पाहायला मिळत आहे. यासह सेवालाल यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचे बंजारा समाजात वेगळाच आनंद दिसत आहे.