'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवर मोदी अन् शिंदेंचा चेहरा पण दादांचा फोटो गायब

‘देवा भाऊं’चे झळकले बॅनर, ‘लाडकी बहीण’च्या बॅनरवर मोदी अन् शिंदेंचा चेहरा पण दादांचा फोटो गायब

| Updated on: Sep 10, 2024 | 3:51 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात पक्षाच्या सोशल मीडियावरुन नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळून ‘दादाचा वादा’ अशी टॅगलाईन वापरत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात आला. ज्यांच्या नावाने ही योजना आहे, या मुख्यमंत्र्याचे नावच तेथून काढून टाकल्याने महायुतीचं वातावरण चांगलंच तापलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातून आज ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट’ या मोहिमेची सुरूवात करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बॅनरवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो झळकले आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो मात्र बॅनरवर कुठेही दिसत नाहीये, त्यामुळे महायुतीत काही धुसफूस आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, भाजपची ही बॅनरबाजी मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावरच भाजपकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘देवा भाऊ… #लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला!’ असा उल्लेख असलेले मोठे बॅनर भाजपकडून लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बॅनरवर देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री या सर्वांचाच फोटो आहे. मात्र उपमुख्यमंत्र्याचा फोटोच काय तर नावाचाही उल्लेखही त्या बॅनरवर नसल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा महायुतीतील समन्वयाबद्दल चर्चा चालू झाली आहे.

Published on: Sep 10, 2024 03:51 PM