आनंद आश्रमातील घडलेल्या प्रकाराबाबत संजय राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आनंद आश्रमातील घडलेल्या प्रकाराबाबत संजय राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले एकनाथ शिंदे?

| Updated on: Sep 14, 2024 | 5:36 PM

ठाण्यातील आनंद आश्रमातील व्हिडिओ अत्यंत विचलित करणारा आहे. तो व्हिडिओ पाहून आम्ही अस्वस्थ झालो आहोत. एक धिंगाणा त्या वास्तूमध्ये आम्ही पाहिला आहे. लुटीचा पैसे तिथे ठेवला जातो का? लुटीच्या पैशांतून असे प्रकार केले जात आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका येथे असणाऱ्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा धक्कादायक व्हिडीओ आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी ट्वीट केला आहे. केदार दिघे हे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत. “तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या. दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले. आमचा आनंद हरपला”, असं केदार दिघे ट्वीटद्वारे म्हणाले आहेत. आनंद दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केल्या म्हणत केदार दिघे यांनी नाव न घेता शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली आहे. गणेशोत्सव विसर्जनानिमित्त टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात ढोल वाजवण्यात आले. टेंभीनाक्यावरील शाखेचे प्रमुख निखिल बुडजूडे, पोलीस लाईन शाखाप्रमुख नितेश पाटोळेंनी नोटांची उधळण केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पैसे उधळतानाचा व्हिडीओ समोर येताच संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केदार दिघे यांच्याकडून ट्वीट केलेला व्हिडीओ हा गुरूवारी १२ तारखेचा असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. तर काय म्हणाले एकनाथ शिंदे बघा व्हिडीओ

Published on: Sep 14, 2024 05:36 PM