Nawab Malik : 'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार? नवाब मलिकांच्या वक्तव्यानं सस्पेन्स

Nawab Malik : ‘पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?’, विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार? नवाब मलिकांच्या वक्तव्यानं सस्पेन्स

| Updated on: Nov 04, 2024 | 1:35 PM

विधानसभेचा निकाल आल्यानंतर राज्यात चित्र बदलणार असं वक्तव्य करत नवाब मलिक यांनी अनेकांची धाकधूक वाढवली असून एकप्रकारे सूचक इशारा दिल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर काहीही होऊ शकतं असं नवाब मलिक म्हणाले तर महायुतीत मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचंही काही तरी चाललंय असं लोक सांगत असल्याचं मलिक म्हणालेत.

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात काहीतरी सुरू असल्याचे काही लोकं सांगतात. तर विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होईल हे सांगता येत नाही, असं वक्तव्य नवाब मलिकांनी एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर नेमकं काय घडणार याबद्दलचा सस्पेन्स आता वाढला आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहे. एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नवाब मलिक म्हणाले, निवडणुकीनंतर भाजपचेच सरकार येईल किंवा शरद पवार हे भाजपाबरोबरच असतील हे आता सांगणे कठीण आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोकं सांगत आहेत की एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काहीतरी चालले आहे. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे, असंही नवाब मलिक यांनी म्हटलंय तर नवाब मलिकांच्या वक्तव्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे.

Published on: Nov 04, 2024 12:43 PM