नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णय, काय केली घोषणा?

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णय, काय केली घोषणा?

| Updated on: Jun 13, 2023 | 4:35 PM

'हे डबल इंजिन सरकार, राज्यातील जनतेची त्याला पसंती', मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

मुंबई : कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात १० हजारांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांना आपलं सरकार भरघोस मदत करणार आहे. नुकसानग्रसत शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लातूरमध्ये पशुरोग निदान प्रयोगशाळा उभारणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार हे डबल इंजिन सरकार झाले आहे. त्याचा फायदा विकास कामांना होत आहे. त्याला राज्यातील जनतेने पसंती दिली आहे. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता आम्ही आणखी जोमाने काम करु. आमचा कामाचा वेग वाढेल. आम्ही पाठवलेले प्रस्ताव नरेंद्र मोदी अन् अमित शाहा जसेच्या तसे मान्य करतात. त्यामुळे राज्याला भरघोस निधी मिळत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Published on: Jun 13, 2023 04:35 PM