श्रेय देण्यास मोठेपणा लागतो, पण काही कद्रु वृत्तीचे…कोस्टल रोडच्या उद्घाटनावेळी शिंदेंकडून ठाकरेंवर टीका
मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजाचं नाव; उद्घाटनावेळी सरकारची मोठी घोषणा.... मुंबईच्या कोस्टल रोड परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा देखील बांधण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुंबई, ११ मार्च २०२४ : मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं आहे. याचा आनंद असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. तर मुंबईच्या कोस्टल रोड परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा देखील बांधण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. “मुंबईकरांच स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी बीएमसीच अभिनंदन करतो. 10 किमीचा एक टप्पा झाला आहे. दुसरा टप्पा मे मध्ये पूर्ण होईल. हा कोस्टल रोड दहीसर पर्यंत जाणार आहे. 53 किमीचा हा मार्ग ज्याला सध्या दोन तास लागतात. पण आता एकातासापेक्षा कमी वेळ लागेल. प्रदूषण कमी होईल, इंधनबचत होईल, असा याचा फायदा आहे” पुढे ते असेही म्हणाले, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना केंद्राकडून पर्यावरणाच्या परवानग्या मिळवल्या. म्हणून हा कोस्टल रोड जलदगतीने पूर्ण होऊ शकला. पण श्रेय द्यायला मनाचा मोठेपणा लागतो. कद्रू मनोवृत्तीचा माणूस हे कधीच करु शकत नाही” अशी टीका शिंदे यांनी नाव न घेता केली.