शिंदे सरकारची मोठी घोषणा, मुंबईकरांना दिलासा, आज रात्रीपासून 'या' वाहनांना टोलमाफी

शिंदे सरकारची मोठी घोषणा, मुंबईकरांना दिलासा, आज रात्रीपासून ‘या’ वाहनांना टोलमाफी

| Updated on: Oct 14, 2024 | 4:28 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा आणि विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे आज किंवा उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात असताना राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारने दिला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज रात्री १२ वाजेपासून मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या टोलमाफीची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू नसणार आहे.

Published on: Oct 14, 2024 11:23 AM